Ticker

6/recent/ticker-posts

किशोरवयीन मुलामुलींसाठी आपल्या कामातून प्रेरणा देणाऱ्या कोकण कन्या सावी मुद्राळे हिला "यु इन्स्पायर" पुरस्कार

छायाचित्र : कोकण कन्या सावी मुद्राळे हिला कोकण कला महोत्सवात "यु इन्स्पायर अवॉर्ड" मुंबई येथील कार्यक्रमात देऊन सन्मानित करण्यात आले.



संजय भोसले

कोकण कन्या अशी आपली वेगळी ओळख असलेल्या आणि झी मराठी वाहिनीवरील ड्रामा ज्युनियर कार्यक्रमातील टॉप 6 मधील स्पर्धक कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील सावी वैभव मुद्राळे हिला कोकण कला महोत्सवात "यु इन्स्पायर अवॉर्ड" मुंबई येथील कार्यक्रमात देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध पुरस्कार देऊन मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल सावीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. 

मी मोठी होऊन काहीतरी करणार, ध्येय साध्य करणार अशी स्वप्ने बघणारी अनेक मुले - मुली मोठे व्हायची वाट बघतात पण काहीजण लहान वयातच आपल्या कलाकारीतेची आणि बुद्धिमत्तेची चमक दाखवतात किंवा आपल्या अंतर्भूत कलागुणांना मेहनतीने जगासमोर यशाची शिखरे पादाक्रांत करण्याची सुरुवात लहान वयातच करतात. स्वप्ने बघून ती पूर्ण होत नाहीत पण मेहनत आणि सातत्य आणि दृढ निश्चयाच्या जोरावर आपली ध्येय पूर्ण करतात. 

मालवणी भाषा आणि स्वर्गभूमी कोकण बद्दलच्या अफवा आणि सत्यता यावर भाष्य करणारी, फक्त फोल्लोवॉर्स मिळावे यासाठी कोणत्याहि पद्धतीचे रील्स न करता चांगले आणि सात्यत्यपूर्ण कन्टेन्ट शेअर करणारी, आपल्या संपन्न अभिनयाच्या जोरावर झी मराठीच्या ड्रामा जुनिअरच्या टॉप 6 पर्यंत धडक मारणारी आणि मालवणी भाषेतील देवाचे गाऱ्हाणे महाराष्ट्रभर पोहोचवणाऱ्या कोकण कन्या सावीला यावर्षीचा यू इन्स्पायर हा पुरस्कार देवून गौरविण्यात आले. 

नुकत्याच मुंबई येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे, हिरवळ ग्रुपचे अध्यक्ष किशोर धारिया, लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका सौ. रेणुताई दांडेकर आणि कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल या मान्यवरांच्या उपस्थित तिला गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात कोकण रत्न, समाजभूषण, कन्टेन्ट क्रिएटरसाठी 'रील टू रियल पुरस्कार', आदर्श गाव पुरस्कार, ग्रामीण भागातील महिलांसाठी झिरो टू हिरो पुरस्कर, युवा उद्योजकांसाठी युथ आयकॉन पुरस्कार अशा विविध पुरस्काराचे वितरण झाले.