वाई प्रतिनीधी- राहुल देशमुख
वाई विधानसभा झालेले मतदान ■ मकरंद पाटील १,४०,९७१ राष्ट्रवादी काँग्रेस ⏰■ अरुणादेवी पिसाळ- ७९,५७९ (राष्ट्रवादी श. प. गट)■ पुरुषोत्तम जाधव ४,६९५ अपक्ष ■ नोटा १७८६
वाई मतदारसंघामध्ये विजयी चौकार मारत राष्ट्रवादीचे आमदार मकरंद आबा पाटील यांनी १ लाख ४० हजार ९७१ मताधिक्य मिळवत विरोधकांना धोबीपछाड दिला आहे. जुना इतिहास पुसत मकरंद पाटील यांनी जिल्ह्यामध्ये दोन नंबरचे मताधिक्य मिळवत पुन्हा वाई मतदारसंघामध्ये पुन्हा 'आबा पर्व' निर्माण करीत विजयश्री खेचून आणली.
शिंदेसेनेचे बंडखोर उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्यासह १३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. वाईत पुन्हा मकरंद आबांचाच थाट राहिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या मतदारसंघामध्ये २ लाख ३६ हजार ८४३ इतके मतदान झाल्याने निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आमदार मकरंद पाटील यांनी ६१३९२ एवढे मताधिक्य मिळवत विजय मिळविला.
Social Plugin