कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी
बदनापुर: दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी, मातोश्री रमाई समाजकार्य महाविद्यालय बदनापूर येथे 75 वा भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिजाऊ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाविषयी चे महत्व पटवून देवून त्यांच्यामध्ये संविधनाविषयी जागृती केली. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून जिजाऊ पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती मापारी मॅडम उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी भारतीय संविधानाची विशेषता काय आहे याविषयी आपले मत व्यक्त केले हे संविधान बनविण्यासाठी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागला.
हे संविधान सर्व विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजे आणि समजून घेतले पाहिजे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. या यावेळी मातोश्री रमाई समाजकार्य महाविद्यालयाचे मा. सिद्धार्थ पवार यांनी भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार शिक्षणाचा अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य याविषयी मुलांना छोट्या छोट्या गोष्टी सांगून त्याविषयी त्यांच्या उत्सुकता निर्माण केली व संविधानातील मूलभूत अधिकार समजावून सांगितले. उपस्थित होते. यावेळी समाजकार्याचे विद्यार्थी भीमराव शेळके निखिल पाखरे, राहुल चाबुकस्वार, रूपाली पवार, तसेच ईतर विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचलन राहुल चाबुकस्वार या विद्यार्थ्याने केले.
कार्यक्रमाच्या शेवटी मातोश्री रमाई समाजकार्य महाविद्यालयच्या सिनिअर विद्यार्थ्यांतर्फे जिजाऊ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप करून समारोप वाटप करण्यात आला.हा कार्यक्रम अत्यंत आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला.
Social Plugin