Ticker

6/recent/ticker-posts

लक्षवेधी ठरलेल्या विधानसभा मतदारसंघात 70. 60% मतदान


राजकुमार चिंचोळकर 

 संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरलेल्या बाळापूर विधानसभा मतदारसंघात सरासरी 70. 60% मतदान झाल्याची माहिती प्राप्त झाली असून मतदारांना निकालाची उत्कंठा लागली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे विधानसभा निवडणुक कार्यक्रम जाहीर होताच बाळापूर विधानसभा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला होता तर निवडणूक प्रचार दरम्यान  दिग्गज नेत्यांच्या सभा मतदार संघात पार पडल्याने निवडणुकीत मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण होवून अटीतटीच्या लढतीत कुठला उमेदवार विजय संपादन करतो या बाबतीत नागरिकांकडून चर्चा रंगल्या जावुन वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत तसेच मिळालेल्या माहितीनुसार बाळापूर विधानसभा मतदारसंघात 310202 मतदार असुन त्यापैकी 219018 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला

 त्यामध्ये 159372 पुरुष मतदार असुन त्यापैकी 116212  पुरुष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तसेच मतदार संघात 150828 महीला मतदार असुन त्यापैकी 102805 महीला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे गत सहा महिने पुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत बाळापूर विधानसभा मतदारसंघात 66.58% मतदान झाल्याची माहिती असुन विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारीत वाढ झाली आहे  विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिये दरम्यान बाळापूर तसेच पातुर तालुक्यातील काही मतदान केंद्रावर मशीन मध्ये तांत्रिक अडचण तसेच सर्वर डाऊन मुळे मतदारांमध्ये तारांबळ उडाली असल्याचे चित्र निर्माण झाले होते तर काही ठिकाणी मतदार यादीतून नांवें गहाळ झाल्याने मतदारांना त्रास सहन करावा लागला तर पती पत्नीचे वेगवेगळ्या मतदान केंद्रावर मतदान असल्याचे मतदार यादीत आढळून आल्याचेही प्रकार समोर आले आहेत तसेच विधानसभा मतदारसंघात रात्री आठ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहील्याची माहिती आहे