Ticker

6/recent/ticker-posts

निलंगा मतदारसंघातील वलांडी जिल्हा परिषद गटातील बुथप्रमुखांचा विजयसंकल्प मेळावा...



प्रतिनिधी विशाल बिराजदार (निलंगा)

निलंगा मतदारसंघातील वलांडी जिल्हा परिषद गटातील बुथप्रमुखांचा विजयसंकल्प मेळावा आज बहुसंख्य बुथप्रमुखांच्या उपस्थितीमध्ये संगमेश्वर मंगल कार्यालय, वलांडी येथे पार पडला.दरम्यान सर्व बुथप्रमुखांनी मतदारसंघात झालेली विकासकामे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्याचा निर्धार करून विजयाचा संकल्प केला. यावेळी उपस्थितांचा उत्साह आणि आत्मविश्वास पाहून उर्जा मिळाली.

या प्रसंगी भैया साहेब यांनी बुथप्रमुखांशी संवाद साधताना, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विकासाची गंगा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी मागील दहा वर्षापासून अविरतपणे कार्य करत आलो आहे. आपल्या सर्वांची साथ आणि मायबाप जनतेच्या आशीर्वादाच्या बळावर निलंगा मतदारसंघात मधील दहा वर्षात अनेक विकासकामे केली आहेत. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून मतदारसंघातील प्रत्येक उंबरठ्याचा विकास ही संकल्पना घेऊन आपण काम करत आलेलो आहोत. या कामाच्या माध्यमातून शेतकरी, महिला, मजूर, विद्यार्थी व तरुण या प्रत्येक घटकांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले आहे, असा विश्वास व्यक्त केला. विरोधकांनी केवळ अपप्रचार करून संभ्रमाचे वातावरण निर्माण केले आहे. विरोधकांच्या या अपप्रचाराला आता आपण सर्व बुथप्रमुखांनी सडेतोड उत्तर देणे गरजेचे आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे आपले कर्तव्य आहे. तसेच भाजपा हाच विकासासाठी प्रयत्नशील असणारा पक्ष आहे आणि भविष्यातही याच पक्षाच्या माध्यमातून देशाचा उत्कर्ष होणार आहे. असे सांगून वलांडी जिल्हा परिषद गटातून आपल्याला मोठ्या प्रमाणात आशीर्वाद मिळावे, यासाठी काम करावे, असे आवाहन संभाजी भैयानी यावेळी केले.


यावेळी प्रदेश सचिव अरविंदजी पाटील ,विधानसभा प्रभारी दगडूजी सोळुंके, जिल्हा सरचिटणीस संजयजी दोरवे, तालुकाध्यक्ष काशिनाथजी गरीबे, माजी जि.प. सदस्य प्रशांतजी पाटील, पृथ्वीराजजी शिवशिवे, कृ.ऊ. बाजार समितीचे सभापती शिवकुमारजी चिंचनसुरे, नरसिंगजी बिरादार, राजकुमारजी हुरगे, चंद्रशेखरजी महाजन, माजी सभापती बालाजी बिराजदार जी, प्रशांतजी पाटील दवणहिप्परगेकर, रामलिंगजी शेरे आदींसह बुथप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.