Ticker

6/recent/ticker-posts

मत्योदरी देवीच्या कमानीचा गेट पडून लहान मुलाचा पाय फ्रॅक्चर



अंबादास गायकवाड वडीगोद्री 

 अंबड येथे दरवर्षी नवरात्र महोत्सवात  मोठ्या गर्दीने भाविक येत असतात. दि.११ ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान मत्स्योदरी देवी संस्थांचे होमगार्ड विलास मगरे यांनी बेजबाबदारपणे जोरात गेट ढकलला तो पडून.आदेश अंकुश अवधूत वय वर्षे १० या मुलाच्या पायावर गेट पडून त्यात, त्याचा उजवा पाय मोडला. 

अंबड शासकीय रुग्णालय  येथे नेले असता तेथील डॉक्टरने जालना येथिल शासकीय रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला दिला तेथे नऊ दिवस उपचार करून दिनांक 19 ऑक्टोंबर 2024 रोजी डिस्कचार्ज दिला अंबड पोलीस स्टेशन येथे रितसर तक्रार देण्यास गेलो असता. पोलिसांनी रीतसर फिर्याद घेतली नाही. तरी बेजबाबदारपणे मत्स्योदरी देवी मंदिराचे विश्वस्त होमगार्ड आणि अंबड पोलीस स्टेशनचे पी.आय.यांच्यावर गुन्हे दाखल करावेत असे पोलीस अधिक्षक जालना यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे