छायाचित्र - पुसेगाव -. कला व वाणिज्य महाविद्यालयात सायबर सुरक्षा विषयक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुहास साठे _ छाया - प्रकाश राजेघाटगे बुध सायबर सुरक्षा ही काळाची गरज आहे _सुहास साठे
बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
आज आपण पूर्वीपेक्षा अधिक इलेक्ट्रॉनिक उपकरणावर अवलंबून असल्यामुळे सायबर सुरक्षा ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन श्री.सुहास साठे यांनी केले.पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य विभाग व हिंदी विभाग यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी.भोसले होते . व्यासपीठावर उपस्थित वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.पी.व्ही. गायकवाड, प्रा.एम.एस.वाघ.प्रा.डाॅ.के.एम.निंबाळकर उपस्थित होते. श्री.साठे आपल्या भाषणात पुढे म्हणाले,'आजकाल बेकायदेशीर हॅकिंगच्या वाढत्या प्रमाणामुळे, तसेच ऑनलाईन फ्रॉडमुळे आपला डेटा लोकांपासून सुरक्षित करण्याची गरज वाढली आहे.
कारण सायबर क्राईमची समस्या ही संपूर्ण जगात आहे. त्यामुळे वैयक्तिक सुरक्षेतेला धोका निर्माण होतो. तसेच मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या, बँका , सहकारी संस्था इ.धोका आहे. त्यामुळे सायबर सुरक्षेचे महत्त्व वाढत आहे. आपल्या जीवनातील भरपूर गोष्टी मोबाईल, इलेक्ट्रॉनिक प्रणाली, नेटवर्क इत्यादीच्या सॉफ्टवेअर वर अवलंबून आहेत. संपूर्ण जग हे इंटरनेट बरोबर जोडलेले असल्यामुळे काही गोपनीय माहिती, आर्थिक डेटा बाहेर पडल्यास आपले नुकसान होऊ शकते. सायबर हल्ल्यापासून आपणास माहिती डेटाचे रक्षण करणे, संगणक सुरक्षा हे जगातील एक मोठे आव्हान आहे. याविषयीची माहिती दिली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी. भोसले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.पी.व्ही गायकवाड यांनी केली. सूत्रसंचालन प्रा.एम.एस.वाघ. यांनी केले. तर आभार प्रा.डाॅ.के.एम.निंबाळकर यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Social Plugin