नवीन महाबळेश्वर प्रकल्प साकारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
पाटण ( दिनकर वाईकर )
पाटण विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने डोंगर पठारावरील व बेभरवशाच्या निसर्गावर अवलंबून शेतीला अपेक्षित न्याय मिळत नाही. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेती पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. भूकंपप्रवण क्षेत्र आदी नैसर्गिक आपत्तीमुळे औद्योगिक क्रांती घडू शकत नाही. एकतर पर्यटन किंवा निसर्गावर आधारित उदरनिर्वाहाची माध्यमे उपलब्ध करण्याशिवाय येथे पर्याय स्थानिक पातळीवर रोजगार खुंटल्याने मोठ्या प्रमाणावर बेरोजगारांचे शहरात स्थलांतर झाले आहे. अशावेळी स्थानिक शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीत वनसंपदेचे रक्षण झाले असून त्यांना या बदल्यात कार्बन क्रेडिटचा फायदा अद्यापही मिळत नाही. कार्बन क्रेडिटचा फायदा मिळाल्यास वनसंपदेचे रक्षण व वाढ होईल, स्थानिकांना प्रोत्साहन मिळाल्याने त्यांच्यासाठी हे उदरनिर्वाहाचे मोठे माध्यम ठरेल यासाठी मी स्वतःच ही लढाई सुरू असून स्थानिक शेतकऱ्यांना आता वाट्टेल त्या परिस्थितीत कार्बन क्रेडिटचा लाभ मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी खात्री राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी एका पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिली.
या पत्रकात विक्रमसिंह पाटणकर यांनी पुढे म्हटले आहे पाटण मतदारसंघातील डोंगरदऱ्यात प्रत्येक शेतकऱ्याच्या मालकीच्या जमीन क्षेत्रावरील प्रत्येक झाडाला कार्बन क्रेडिट स्वरूपात उत्पन्न मिळवून देणार आहे. हे उत्पन्न ज्या क्षेत्रात झाडं जितकी वर्षे असतील तेवढी वर्ष शेतकऱ्याला उत्पन्न मिळत राहील. लाखो व कोट्यावधी रुपयांची उत्पन्न शेतकरी आपल्या शेतातील जमिनीवर कार्बन क्रेडिट स्वरूपात मिळू शकेल. जागतिक हवामान सुधारण्यासाठी व विषारी वायू कमी करण्यासाठी या झाडांचा उपयोग होईल. कार्बन क्रेडिटच्या स्वरूपात जागतिक बाजारपेठेत प्रत्येक शेतकरी उत्पन्न मिळवून देणारा हा आता माझा पुढील संकल्प असणार आहे. आजपर्यंत जे जे मी ठरवले ते ते मी प्रत्यक्षात आणले. उदाहरणार्थ पवन ऊर्जा प्रकल्प तालुक्यात आणला त्यातून मागील पंचवीस ते तीस वर्षात एकट्या सातारा जिल्ह्यात त्यातही प्रामुख्याने पाटण तालुक्यात हजारो नोकऱ्या, रोजगार , व्यवसाय, उदरनिर्वाची साधने निर्माण झाली. नवीन महाबळेश्वर प्रकल्पाची संकल्पना २००३ सालात मांडली राज्याच्या पर्यटनमंत्राची जबाबदारी येतात सन 2004 मध्ये नवीन महाबळेश्वर प्रकल्पाला मंजुरीही देण्यात आल. तो नवीन महाबळेश्वर प्रकल्प आता नावारूपाला येत आहे त्याविषयी मला समाधान आहे.या प्रकल्पातून तालुक्यात कमीत कमी साडेचार हजार व्यवसाय, रोजगार निर्माण होतील व या डोंगरावर पठारावरील बेरोजगारी कायमस्वरूपी दूर होऊन तरुणांच्या हाताला काम मिळेल. व्यवसाय ,उद्योगांची संधी मिळेल व त्यांच्या संपत्तीत वाढ होईल, याचा फायदा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना होणार असून हाही प्रकल्प यशस्वी केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही.
आजही अशा प्रकारचे प्रकल्प करण्याची माझ्या मनात जिद्द आहे तुमची सर्वांची साथ मिळणे आवश्यक आहे हेच काम सत्यजित पाटणकरसुद्धा यशस्वीपणे करू शकशील याची मला पूर्णपणे खात्री आहे.कार्बन क्रेडिटमुळे स्थानिकांना आपल्या शेतात फळे, फुले इत्यादी अतिरिक्त उत्पन्नही घेता येईल .आपल्या मुलाबाळाप्रमाणे ते झाडे लावतील, जगवतील, वाढवतील त्याची निगा राखतील व वैयक्तिक स्वरूपाचा फायदा झाल्यामुळे निश्चितच समर्थपणे या गोष्टी पार पडतील. केवळ जाचक, अटी निर्बंध लावून आणि कोणत्याही प्रकारच्या लाभ न दिल्याने मग बेसुमार वृक्षतोड होते आणि त्याला कोणत्याही प्रकारचा आळा बसत नाही याचाही विचार करणे गरजेचे आहे. शासन वन संरक्षणासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करते मात्र तो कित्येकदा वाया जातो. परंतु जर शेतकऱ्यांनाच त्यांचे खासगी जमिनीत झाड वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले, कार्बन क्रेडिटचा जगभरात मोठ्या प्रमाणावर स्थानिकांना लाभ होतो तोच लाभ या जनतेलाही दिला तर निश्चितच स्थानिक झाडं जोपासतील यातून पर्यावरणही अबाधित राहील, आणि कोणत्याही नुकसानीशिवाय स्थानिकांचे जनजीवन सुजलाम सुफलाम व समृद्ध होईल या दृष्टीने शासन, प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे .आता यापुढे या कार्बन क्रेडिटसह नवीन महाबळेश्वरची प्रकल्पाची निर्मिती करणे हाच माझा ध्यास असून हे प्रकल्प यशस्वी केल्याशिवाय मी आता स्वस्थ बसणार नाही असा विश्वासही शेवटी विक्रमसिंह पाटणकर यांनी या पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.
Social Plugin