संजय भोसले
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्या- सिंधुदुर्गनगरी या पतपेढीची अध्यक्ष निवड सभा पतपेढीच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये दि.२३.१०.२०२४ रोजी मा. अध्यासी अधिकारी श्री.एम.एस. धुमाळ मुख्य लिपीक अधिन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्गनगरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर निवड सभेत संचालक सुरेंद्र गंगाराम लांबोरे (शा.वि.कुलकर्णी माध्यमिक विदयालय मोंड ता. देवगड जि. सिंधुदुर्ग) यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
तसेच संचालक श्री.शरद बाजीरव देसाई (किर्ती माध्यमिक विदयालय घोटगेवाडी ता.दोडामार्ग जि.सिंधुदुर्ग) यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. सदर निवडीनंतर माजी अध्यक्ष संजय रामचंद्र वेतुरेकर, माजी उपाध्यक्षा श्रीम. सुमेधा तुकाराम नाईक, संचालक जयवंत केशव पाटील, मारुती पुजारी,सत्यपाल लाडगावकर, सुमित मसुरकर, रमाकांत नाईक, आशिष शिरोडकर ,प्रदिप सावंत,स्वप्निल पाटील, समिर परब, संदिप कदम,श्रीम. विदया शिरसाट यांनी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या, तसेच पतपेढी सचिव श्री. प्राजक्त सावंत व कर्मचारी वर्गाने शुभेच्छा दिल्या सदरच्या निवड सभेस सौ. लांबोरे मॅडम, श्री. अच्युत वनवे सर विदयामंदिर हाय कणकवली, श्री. गंगाराम नावू बोडके, देवगडकर, प्रशांत आडेलकर,सी.डी. चव्हाण, यांनीही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
Social Plugin