कैलास कोल्हे @ ग्रामीण प्रतिनिधी
काजळा : या वर्षी प. पु. बलदेव बाबा बाभुळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त मंदिर काजळा येथे चक्रपाणी अवतार दिन साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने महाप्रसादाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने चितनीजनक प. पु. बाभुळगावकर शास्त्री यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते, त्यांनी सांगितले की,
चक्रपाणी महाराज त्यांना द्वारावतीकार श्रीचांगदेवो राऊळ नावाने ओळखले जाते. त्यांनी फलटण येथे कर्हाडे शाखेतील ब्राम्हणाच्या घरी शके १०४३रोजी अवतार धारण केला. फलटण या ठिकाणी त्यांचे ३६ वर्षाचे वास्तव्य झालेले आहे. या कालावधीत त्यांनी अनेक परीने जीवोद्धरणाचे कार्य केले. शके १०७९ मध्ये ते यात्रेकरुसमवेत माहूर या ठिकाणी आले. याठिकाणी त्यांनी श्रीदत्तात्रेय प्रभु यांना गुरुस्थानी मानून त्यांच्याकडून व्याघ्रवेषामध्ये परावर शक्तीचा स्विकार केला. यानंतर माहूरहून द्वारावतीला प्रस्थान केले. द्वारावतीस श्रीचांगदेवराउळांचे ६३ वर्षे पाताळगुंफेत वास्तव्य होते. या कालावधीत त्यांनी अनेक परीचे समाजोद्धाराचे कार्य केलेले आहे. श्रीचांगदेवो राऊळ सूप आणि खराटा घेऊन द्वारकेची स्वच्छता करीत असत. खर्या अर्थाने स्वच्छतेचे अग्रदूत होय. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ५२ पुरुषांना स्थूळ विद्येचे तर ८४ जीवांना शिल्प विद्येचे दातृत्व केले. अनेक दु:खी, वंचित पिचलेल्या लोकांच्या वेदना दूर केल्या. जोगर्याला ज्ञानाचे दातृत्व केले. असे अनेक जीवांचा उद्धार करुन शेवटी कामाख्या या हटयोगिनीच्या निमित्ताने देहत्याग करुन भडोच येथील प्रधान पुत्राचे पतीत उठवून आपले अवतार कार्य पुढे अव्याहत चालू ठेवले, असे त्यांचे कार्य आहे, असे प्रवचनात सागितले.
या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भाविकांनी लाभ घेतला.
Social Plugin