Ticker

6/recent/ticker-posts

दिलिपराव फुके यांचा नागरी सत्कार संपन्न



प्रतीनिधी--संजय भरदुक मंपीर

मंगरूळपीर--आज दिनांक २१ आक्टोबर सोमवार ला चांभई या त्यांच्या गावात गावातील शेतकरी व परिसरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.त्यांना मिळालेला वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार प्राप्त झाला या निमित्ताने त्यांच्याच मित्रमंडळी यांना आंनद द्विगुणित झाला होता. नेहमी शेतकरी बांधव च्या हाकेला त्वरित मदतीला धावून जाणारे असं व्यक्तिमत्त्व बिबिएफ तंत्रज्ञानाचे जनक आदर्श शेतकरी व्यक्तीमत्व प्रयोगशील शेतीनिष्ठ शेतकरी श्री दिलीपराव फुके साहेब यांचा नागरी सत्कार करण्याचा कार्यक्रम ठरविण्यात आला होता.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोबिन हक मंगरूळपीर हे होते.

प्रमुख पाहुणे म्हणून बाळखेड ता.रिसोड येथील श्री विलासराव गायकवाड, श्री रविंद्रजी इंगोले, साहेब ,कॄषी अधिकारी सचिन कांबळे,प्रा.प्रमोदजी ठाकरे मुर्तिजापूर, श्री विठ्ठलराव पाकधने, श्री विलासराव झारे मंडळ अधिकारी, कवी रशीद शादा ,तसेच कॄषी विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते बरीच शेतकऱ्यांची उपस्थिती होती.तसेच पाणी फाउंडेशन समन्वयक अधिकारी श्री गवई सरांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ.पंजाबराव देशमुख व वसंतराव नाईक,यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमला सुरूवात करून मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि फुके यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य दिव्य असा नागरी सत्कार करून गौरविण्यात आले.आणि त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले नंतर श्री संजय मुळे यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर व शेतकरी बांधव आणि महिला अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे यशस्वी करण्यासाठी सरपंच प्रितम भगत, मारोती गावंडे, गजानन फुके, मनोज फुके, गजानन ठाकरे,कुणाल ठाकरे मुर्तिजापूर,नेहा ठाकरे मॅडम, सुर्वे मॅडम,मेधाताई चौधरी, अविनाश सावके,शुभम पंचभाई इतर गावांतील शेतकरी बांधव यांनी परिश्रम घेतले व शेवटी स्नेह भोजनांचा आस्वाद घेवून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.