Ticker

6/recent/ticker-posts

श्री शिवाजी विद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहाच्या कामाचा प्रारंभ



 छायाचित्र -डिस्कळ येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहाच्या कामाचा श्रीफळ वाढवून प्रारंभ करताना संस्थेचे सचिव प्रा.सुनील दळवी ,शेजारी संस्थेचे अध्यक्ष श्री प्रदीप गोडसे , माजी उपसभापती लवकुमार मदने व संस्था पदाधिकारी छाया - प्रकाश राजेघाटगे बुध .

बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

 डिस्कळ येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहाच्या कामाचा प्रारंभ संस्था पदाधिकारी व ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.   मुख्याध्यापक आर.एम.डांगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले .याप्रसंगी माजी उपसभापती लवकुमार मदने, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रदीप गोडसे, सचिव प्रा.सुनील दळवी, जगन्नाथ कर्णे, वसंतराव काटकर , गणपत काटकर, उपशिक्षक विलास काटकर , दत्तात्रय चव्हाण आदींची उपस्थिती होती.

 यावेळी सचिव‌ प्रा. सुनील दळवी म्हणाले, पुणे येथील सार्थक वेल्फेअर फाउंडेशन ही सेवाभावी संस्था असून कंपनी सी एस आर फंडातून दहावी ते पदवी पर्यंत च्या गरीब ,गरजू , होतकरु व हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.  शाळांना गरजेनुसार भौतिक सुविधासाठी सहकार्य केले जात असून बहुउद्देशीय सभागृहाच्या कामासाठी फौन्डेशन चे सहकार्य अमूल्य आहे. *मुख्याध्यापक आर एम डांगे म्हणाले, ' शिवाजी विद्यालयास  सभागृहाची आवश्यकता होती. सार्थक फौन्डेशनतर्फे सभागृहाचे काम सुरु करण्यात आले आहे. या कामासाठी फौन्डेशन चे समन्वयक संग्राम लवकुमार मदने यांचे योगदान कौतुकास्पद असल्याचे श्री डांगे यांनी यावेळी सांगितले .   माध्यमिक लिपिक संघटनेचे तालुका अध्यक्ष बलराम घोरपडे यांनी आभार मानले.