Ticker

6/recent/ticker-posts

नोएडा येथे तीन दिवशीय नॅशनल कॉन्फरन्स आणि वर्कशॉप याचा आयोजन

 


ध [ प्रकाश राजेघाटगे ] 

रक्तदाता हा देव नाही पण देवापेक्षा कमी ही नाही असे मत नॅशनल कॉन्फरन्स दिल्लीमध्ये रणशिंगवाडिचे सुपुत्र  आप्पासाहेब घोरपडे यांनी व्यक्त केले .

फेडरेशन ऑफ इंडियन ब्लड डोनर्स ऑर्गनायझेशन आणि जैविक राष्ट्रीय जैविक संस्थान यांच्यामार्फत राष्ट्रीय जैविक संस्था NIB नोएडा येथे तीन दिवशीय नॅशनल कॉन्फरन्स आणि वर्कशॉप याचा आयोजन केलं होतं.या नॅशनल कॉन्फरन्स मध्ये देश देशांमध्ये रक्त आणि रक्तदान या विषयावर ज्या काही प्रॉब्लेम्स येतात यावर चर्चा केली आणि केंद्र सरकारमधील प्रतिनिधी यांनी  उपाययोजना करण्यासंदर्भात मत व्यक्त केलेतसेच रक्तदात्यांसाठी नॅशनल हेल्थ पॉलिसी संदर्भात विचार करण्यात येईल असे रक्तदाते आणि संस्था यांनी अनुमती देण्यात आली .

स्वास्थ आणि परिवार कल्याण मंत्रालय NBTC डायरेक्टर श्रीकृष्ण कुमार सर  हे बोलले की नॅशनल हेल्थ पॉलिसी तयार करून लवकरच प्रत्येक रक्तदात्याला साठी लागू करण्यात येईल की ज्याचे शुल्क नॉर्मल असेल आणि त्या रक्तदात्याला त्याचा फायदा होईल.ह्या कॉन्फरन्स मध्ये महाराष्ट्रातून आप्पासाहेब घोरपडे (श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान) यांची निवड करण्यात आली होती त्यांनी आप्पासाहेब घोरपडे यांनी कॉन्फरन्स मध्ये रक्तदात्यांच्या सुरक्षित संदर्भात आपल्या सर्वांनी नक्की काय केले पाहिजे या संदर्भात मत व्यक्त केले तसेच रक्तदान करणाऱ्या व्यक्तीसाठी सरकारने सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात ,यामुळे रक्तदान रक्तदाते यांची संख्या वाढेल तसेच मोठमोठे  हॉस्पिटल मधील शस्त्रक्रिया या लवकर होण्यास मदत होईल आणि रक्ताचा तुटवडा सुद्धा भरून येईल असे आप्पा घोरपडे यांनी केले

रक्तदान करणारे जास्तीत जास्त सामान्य लोकच आहेत आणि त्यांनाच सेवा सुविधा मिळत नाहीत रक्तदान करणारा देव नाही पण देवा पेक्षा कमी पण नाही असे  त्यांनी मत व्यक्त केले पण त्याच रक्तदात्याला जर काही प्रॉब्लेम आला आरोग्य संदर्भात तर त्याला कुठेच सवलत ,सेवा मिळत नाही याचीच मोठी खंत त्यांनी या कॉन्फरन्स द्वारे भारतातील सर्व राज्यांमधील कॉर्डिनेटर यांच्यासमोर मांडली


या कॉन्फरन्ससाठी देशभरामधून 23 राज्यातून 101 प्रतिनिधी होते. महाराष्ट्रातून  आप्पा घोरपडे यांची निवड झाली होती या कॉन्फरन्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल्स डायरेक्टर नीलिमा मिश्रा ,आकांक्षा बीस्ट मॅडम ,फिबडो के अध्यक्ष बिश्वरूप विश्वास सर , विनय शेट्टी सर , सैनी सर ,शहनाज भाई ,शैनी सर, आणि पूर्ण भारतामधील कॉडिनेटर उपस्थित होते