बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
पुणे येथील टेक महिंद्रा कंपनीकडून विसापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस १० संगणक संच प्रदान करण्यात आले. ग्रामीण भागातील शाळेची व विद्यार्थ्यांची गरज ओळखून शाळेने केलेल्या मागणीची कंपनीने पूर्तता केली आहे. कंपनीच्या सीएसआर फंडातून आणि विसापूर गावची सुकन्या कंपनीमध्ये कार्यरत टीम लीडर ऋतुजा अंधळकर हिच्या प्रयत्नाने शाळेला हे संगणक प्रदान करण्यात आले आहेत. यावेळी कैलास साळुंखे, राजेश ढोले, शिक्षक ज्ञानेश्वर धायगुडे व कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते
Social Plugin