अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
आज दि.२४ रोजी सकाळी ११ वाजेला युट्युब बी-७ चॅनलच्या माध्यमातुन लाईव्ह चालु असताना बजाज बिष्णोई लेडर या खात्यावरुन आमचा एक मेबर इच्छुक उमेदवार म्हणुन मध्ये जाऊन पाटलाचा गेम करणार आहे.लक्ष देऊन बग सगळे आता दहा मिनिटामध्ये पाटलांचा कार्यक्रम १००% अशा स्वरूपाची जिवे मारण्याची धमकी मिळाली असल्यामुळे बजाज बिष्णोई लेडर या खात्याचा शोध घेऊन संबधीतावर कडक कारवाई करण्यात यावी व संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटलांची पोलीस सुरक्षा वाढवावी असे निवेदन अंबड उपविभागीय पोलीस अधिकारी याना देण्यात आले. ताबडतोब संघर्षयोध्या मनोज जरांगे पाटील याची सुरक्षा वाढविण्यात आली.
Social Plugin