बुध दि .[ प्रकाश राजेघाटगे ]
खटाव येथील माजी सरपंच व ज्येष्ठ पत्रकार एम. आर. शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त येत्या गुरुवारी (ता. ३१) सकाळी नऊ वाजता अंबाबाई मंदिर सभागृहात विविध कार्यक्रम आयोजिल्याची माहिती खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम यांनी दिली.
पत्रकार संघ आणि विविध सार्वजनिक मंडळांतर्फे गेली २९ वर्षे विधायक उपक्रम राबवून हा स्मृतिदिन साजरा केला जातो. यंदा उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव (गृह) वैभव राजेघाटगे यांचे ‘देणे समाजाचे नाते कृतज्ञतेचे ’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या वेळी क्रीडा, सामाजिक, महिला सबलीकरण, संशोधन आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कामगिरी करणाऱ्या रघुनंदन मुळे, संगीता दरेकर, दाऊद शेख, कुमार गुरव, मनिषा इगावे, नूरजहाँन शेख, संध्या शेडगे, ओम कुदळे, विराज देशमुख, रुपाली झिरपे यांचा गौरव करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयास पुस्तके देण्यात येणार आहेत. या वेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अंबाबाई क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
Social Plugin