बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
सातारा जिल्हा कारागृहातील महिला बंद्यांसाठी ऑन्को – लाईफ कॅन्सर सेंटर प्रा.लि. सातारा व ध्यास फाउंडेशन, सातारा यांच्या सहयोगाने कारागृहातील महिला बंदयांसाठी "ब्रेस्ट् कॅन्सर व गर्भाशयाचा कॅन्सर कॅम्प्" घेण्यात आला. तसेच महिला व पुरुष बंद्यांसाठी "तोंडाचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर, फुफुसाचा कॅन्सर, आतड्यांचा कॅन्सर, किडनीचा कॅन्सर" असे सर्वंकष तपासणी शिबिर घेण्यात आले.
डॉक्टर दिपाली देसाई यांना महिला व पुरुष बंद्यांना सर्व कॅन्सरबाबत योग्य माहिती दिली व आहारामधील बदलांबाबत व सुयोग्य आहार कसा घ्यावा याची माहिती देऊन महिला बंद्यांची तपासणी केली. तसेच पुरुष बंद्यांची सुरज साबळे यांनी तपासणी केली.
सदर कॅन्सर चेकअप शिबिरासाठी ध्यास फाउंडेशनच्या अध्यक्षा वैजयंती ओतारी, कविता देशमुख, श्रुती दिक्षित, वैशाली देवी, सुयोगा शिंदे इत्यादी हजर होते. तसेच कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे, सुभेदार दत्ताजी भिसे, हवालदार दारकु पारधी, महिला शिपाई अश्विनी पुजारी, काजल सायमोते, रेश्मा गायकवाड, रूपाली नलवडे, अंकिता करपे, प्रतीक्षा मोरे, गीता दाभाडे, ज्योती शिंगरे ई. हजर होते.
Social Plugin