बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
समाजामध्ये वावरत असताना प्रत्येकाने त्याग आणि औदर्याची भावना दाखवून गरजूंना संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. पुढील पिढीला संस्कार आणि प्रेरणा देण्यासाठी सामाजिक भान जपण्याची गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव (गृह) वैभव राजेघाटगे यांनी व्यक्त केले.
खटाव येथे माजी सरपंच व ज्येष पत्रकार एम. आर. शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अंबाबाई मंदिर सभागृहात आयोजित व्याख्यानात ‘देणे समाजाचे, नाते कृतज्ञतेचे’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी अरुण आदलिंगे, सुभाष बोराटे, बाळासाहेब शिंदे जीवन इंगळे ,नारायण मुळे, प्रदीप विधाते, किशोर काळोखे, विलास भोसले, किशोर डंगारे, मोहन कचरे ,मोहन घाडगे, मेहबूब शेख, प्राध्यापक गंगाराम शिंदे, रमेश अडसूळ, परशुराम बनकर, विजयराव बोर्गे आदी उपस्थित होते.
श्री. राजेघाटगे पुढे म्हणाले, जी लोकं दुसऱ्याच्या समाधानासाठी जगतात ती आरोग्यदायी आणि आनंदी राहतात. आनंदी जीवन जगण्यासाठी श्रीमंती गरजेची नसून संस्कार महत्त्वाचे असतात. माणसाने आनंद पैशात न शोधता तो साध्या-साध्या गोष्टीत मिळवायला शिकलं पाहिजे. यासाठी दातृत्त्वाचा भाव आणि मनाचा मोठेपणा टिकवता आला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या मातीत सामाजिक कार्य करून तरुण पिधीपुढे आदर्श निर्माण केला पाहिजे., असे मत श्री. राजे घाटगे यांनी व्यक्त केले.
या वेळी क्रीडा, सामाजिक, महिला सक्षमीकरण, संशोधन आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेणादायी कामगिरी करणाऱ्या रघुनंदन मुळे, संगीता दरेकर, दाऊद शेख, कुमार गुख, मनीषा इगावे, नूरजहॉन शेब, संध्या शेडगे, ओम कुदळे, विराज देशमुख, रूपाली झिरपे यांचा गौरव करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयास पुस्तकेही भेट देण्यात आली.
प्रमुख पाहुण्यांचे नितीन शिंदे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अविनाश कदम यांनी केले. तर पत्रकार संजय देशमुख यांनी आभार मानले.
Social Plugin