छायाचित्र .: बारामती : बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक स्विकारताना आदित्य खामकर व टीम |
बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
बारामती येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत साताऱ्यातील अजिंक्यतारा माध्यमिक विद्यालय शेंद्रेचा माजी विद्यार्थी व सध्या प्रतिभा निकेतन उच्य-माध्यमिक विद्यालय मुरुम, येथे शिकत असलेल्या आदित्य विजय खामकर या विद्यार्थ्याने सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत राज्यस्तरावर आर्यन बिराजदार व अर्जुन बिराजदार यांच्या साथीत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले.
आदित्यच्या या यशाबददल राष्ट्रीय कुस्ती संघाचे प्रशिक्षक जितेंद्र कणसे, जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे अध्यक्ष कृष्णात फडतरे, मार्गदर्शक श्रीकांत वाड, शिक्षक, प्रशिक्षक व आदींनी त्याचे व सर्व टीमचे अभिनंदन केले. या टीममधील खेळाडूंची चेन्नेई येथे राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
Social Plugin