. संजय भोसले
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत दिपावली सणानिमित्त कला शिक्षक प्रसाद राणे सरांच्या संकल्पनेतून दिपावली ग्रेटींग कार्ड विद्यार्थांनी तयार केली. .परंपरागत पद्धतीपेक्षा प्रत्येक सणांचे ग्रेटींग कार्ड संकल्पना वेगवेगळी असते .पण प्रशालेने विधानसभा निवडणूकीचे औचित्य साधून घराघरातील मतदार बंधू भगिनीना मतदानाचा हक्क बजावणे हे राष्ट्रीय कार्य आहे. लोकशाहिला प्रेरणा देणारे आणि देशहिताला बळकटी निर्माण करणारे राष्ट्र हिताचे महत्वपूर्ण कार्य आहे .
या विषयीचे ग्रेटींग कार्ड तयार करून विद्यार्थ्यांनी कणकवली शहरात आजूबाजूच्या वाडी वस्तीत ग्रामीण भागातील गावात ग्रेटींग कार्ड वाटून मतदान करण्यासाठी जागृत केले .इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थांनी सहभाग घेऊन राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविला .यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सरांनी मतदानाचे राष्ट्रीय महत्व आणि लोकशाही या विषयी मार्गदर्शन करून या उत्कृष्ठ उपक्रमाचे कौतुक केले .पर्यवेक्षिका सौ जाधव मॅडम, जेष्ठ शिक्षक श्री वणवे सर ,श्री शेळके जे जे सर ,सौ वारघडे मॅडम ,सौ शिरसाठ मॅडम ,श्री दरवडा सर ,सौ मठकर मॅडम आदी उपस्थित होते.
Social Plugin