प्रतिनिधी : कृष्णा महाले उल्हासनगर
उल्हासनगर : सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या केमिकल प्लांट मधील लोखंडी गंजलेला शेड कोसळल्याने शेडवरून पडून किडनीला मार लागल्याने राजकुमार पवार नावाच्या ५५ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख यांनी सेंच्युरी रेयान कंपनीच्या व्यवस्थापनाला केली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की गेल्या मंगळवारी दि.२२ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या केमिकल प्लांट मधील लोखंडी गंजलेल्या दुरावस्थेत असलेला शेड अचानक कोसळल्याने शेड वरून पडून किडनीला मार लागून ५५ वर्षीय राजकुमार पवार नावाच्या कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना उल्हासनगर शहाड येथील सेंच्युरी रेयॉन कंपनीत घडली आहे.
सेंच्युरी रेयॉनमध्ये वारंवार अश्या जीवघेण्या घटना घडतात परंतु औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कंपनी व्यवस्थापनाच्या चुकांवर नेहमीच पांघरून घातले जात असल्याने कंपनी व्यवस्थापन आणि संबंधित विभागाचे अधिकारी ही या दुर्दैवी घटनेला सर्वस्वी जबाबदार आहेत असा माझा संबंधित अधिकाऱ्यांवर स्पष्ट आरोप आहे, त्यामुळे सदर घटनेला जबाबदार असणाऱ्या सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या बेजबाबदार व्यवस्थापनाच्या विरोधात तात्काळ कडक कारवाई करून महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातील अधिकाऱ्यांनी आपण कर्तव्यदक्ष असल्याचे सिद्ध करून दाखवावे. अन्यथा औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातील अधिकाऱ्यांचा निष्क्रियपणा आणि सेंच्युरी व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा याविरोधात आपणास शासन दरबारी तसेच न्यायालयात पाठपुरावा सुरू करावा लागेल. असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख यांनी सेंच्युरी रेयान कंपनीच्या व्यवस्थापनाला दिला आहे.
Social Plugin