अकोला : अकोल्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. अकोल्यातील पाच विधानसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. बाळापूर विधानसभा मतदारसंघातून नतीकोद्दिन खतीब, मूर्तिजापूरमधून डॉ. सुगत वाघमारे, अकोट - तेल्हारामधून दीपक बोडखे, अकोला पश्चिममधून डॉ. झिशान हुसैन आणि अकोला पूर्वमधून ज्ञानेश्वर सुलताने हे रिंगणात आहेत.
वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. अकोल्यातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. अर्ज दाखल करण्यासाठीची रॅली की विजयी रॅली ? असा प्रश्न अनेकांना पडला होता.
आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला आरक्षणाच्या मुद्द्यावरून मिळणारा जनतेचा प्रतिसाद पाहता अकोल्यातील विधानसभा मतदारसंघात विजयी होणार अशा चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोल्यात यंदा वंचित विजयी होणार असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Social Plugin