पुसेगाव - कला व वाणिज्य महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा याविषयी मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. संदीप पोमण,व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्यडॉ.आर.पी. भोसले, समवेत रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रा.डाॅ.संजय क्षीरसागर,प्रा.डाॅ.एन.डी.लोखंडे छायाचित्र -प्रकाश राजेघाटगे बुध
बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपणांसमोर चांगले आदर्श ठेवून स्वतःमध्ये गुणवत्ता सिद्ध केली तर जीवन बदलू शकते असे प्रतिपादन सपोनि संदीप पोमण यांनी केले. पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी.भोसले होते. व्यासपीठावर प्रा.डॉ.संजय क्षीरसागर, प्रा.डॉ.एन.डी. लोखंडे, प्रा. एस .आर. धोंगडे उपस्थित होते. श्री.पोमण आपल्या भाषणात म्हणाले,'विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडविण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जिद्द, चिकाटी, परिश्रमाने सातत्यपूर्ण अभ्यास केला तर आपोआपच मनामध्ये असणारा न्यूनगंड नाहीसा होतो.
त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम व्यवस्थित समजून घेऊन अभ्यासाचे योग्य प्रकारे नियोजन केले तर प्रशासकीय अधिकारी बनून आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करता येऊ शकते, त्याचबरोबर समाजाची सेवा करण्याची संधी मिळू शकते याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणातून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी.भोसले म्हणाले,'स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी पदवी शिक्षणाबरोबर स्पर्धा परीक्षेतील अभ्यासक्रम, चालू घडामोडी या विषयाचे विद्यार्थ्यांनी सतत वाचन, मनन ,चिंतन केले तर ज्ञानामध्ये वाढ होऊन आपणामध्ये जाणीव जागृत होते.
याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ.संजय क्षीरसागर यांनी केला. सूत्रसंचालन प्रा. एस. आर धोंगडे यांनी केले. आभार प्रा.संग्राम जाधव यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक ,विद्यार्थी,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Social Plugin