दि. २५. (संजय भोसले)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद पुणे व महाराष्ट्र राज्य ज्युदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे बालेवाडी येथे आयोजित राज्यस्तर शालेय ज्यूदो स्पर्धेत१९ वर्षाखालील ४० किलो वजनी गटात इ.९ वी मधील कु.शुभम सुरेश राठोड याने लातुर आणि मुंबई विभागातील प्रथम क्रमांक प्राप्त खेळाडूवर आपल्या उत्कृष्ट खेळीने मात करून ब्राँझ पदकावर आपले नाव कोरले असून त्याला पुणे क्रीडा अधिकारी शिवाजी कोळी, राष्ट्रीय पंच पवार यांच्या शुभहस्ते कांस्य पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.कासार्डे माध्यमिक विद्यालयाची राज्यस्तरावरील ज्यूदोतील यशाची परंपरा कायम ठेवली. कासार्डे हायस्कूलचा शुभम राठोड हा 40 कि.ग्रॅ. वजनी गटाचे कोल्हापूर विभागाचे राज्यस्तरावर नेतृत्व करीत होता.
या यशस्वी खेळाडूचे आणि प्रशालेचे क्रीडा शिक्षक तथा सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असोसिएशनचे सचिव श्री दत्तात्रय मारकड, अभिजीत शेट्ये,देवेंद्र देवरुखकर,दिवाकर पवार,सोनु जाधव, साईप्रसाद बिजितकर व क्रीडा विभागातील इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे .
या यशस्वी खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम.विद्या शिरस , क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड,सचिन रणदिवे तसेच कासार्डे विकास मंडळ मुंबई चे अध्यक्ष मनोज शेलार, सरचिटणीस रोहिदास नकाशे स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे,स्कुल कमिटी सर्व पदाधिकारी,
विद्यालयाचा पालक शिक्षक संघ तसेच कासार्डे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.बी.बी.बिसुरे,पर्यवेक्षक एस.व्ही.राणे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
Social Plugin