शेख अमिरपाशा
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार प्रदीप नाईक यांनी दिनांक 29 ऑक्टोबर रोजी किनवट/ माहूर विधानसभेसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भारत माता की जय, प्रदीप नाईक तुम आगे बढो, अशा घोषणांनी किनवट शहर दणानुन गेले. किनवट येथील आंबेडकर चौकापासून विशाल रॅली ची सुरुवात झाली बंजारा समाजातील महिलांनी पारंपारिक वस्त्र परिधान करून विशाल रॅलीत सहभाग घेतला. या रॅलीमध्ये सर्व समाज उपस्थित होते व तसेच युवा पिढी उपस्थित होते. अनेक पथकाने नृत्याने रॅलीला रंगत आणली. नाईक साहेबांवर जनतेचे प्रेम बघून. सर्व जनतेचे आभार मानले.
Social Plugin