चिखली : राहुल बोंद्रे; मलकापूर : राजेश एकडे
बुलढाणा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली असून, पहिल्याच यादीत चिखली विधानसभा मतदार संघातून राहुल बोंद्रे तर मलकापूर विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार राजेश एकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर झालेल्या पहिल्या यादीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ४८ मतदार संघातील उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात बुलढाणा जिल्ह्यातील हे दोन मतदार संघ आहेत. बुलढाणा जिल्ह्यात सात पैकी चार मतदार संघ काँग्रेसकडे असून, जळगाव जामोद व खामगाव यांचे उमेदवार अजून जाहीर व्हायचे आहेत.
चिखली मतदार संघातून राहुल बोंद्रेना सलग पाचव्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. २००४ व २०१९ मध्ये राहुल बोंद्रे यांचा पराभव झाला होता, तर २००९ व २०१४ च्या मोदी लाटेतही राहुल बोंद्रे विजयी झाले होते. तर मलकापूर मतदार संघातून राजेश एकडे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. २०१९ मध्ये त्यांचा विजय झाला होता, यावेळी पुन्हा त्यांच्यावर काँग्रेसने जबाबदारी सोपवली आहे.
Social Plugin