Ticker

6/recent/ticker-posts

राजेश टोपे यांचा तीन खासदाराच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करीत महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल

अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ

   घनसावंगी विधानसभा मतदार संघातून राजेश टोपे यांनी सहाव्यांदा महाविकास आघाडीच्या तीन खासदार व प्रमुख पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत प्रचंड शक्तीप्रदर्शन करीत तुतारी घेऊन उभा असलेला माणूस या चिन्हावर आपला उमेदवारी अर्ज भरला असून यावेळी शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय जाधव,कॉंग्रेसचे खासदार डॉ.कल्याण काळे,राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हे,मानवी हक्क अभियानचे मिलिंद आवाड,भीमराव हत्तीआंबरे,जालना जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख,उत्तमराव पवार,जिल्हाध्यक्ष निसार देशमुख,नंदकुमार देशमुख,सतीश टोपे, जि.प.सदस्य.राम सावंत,तात्यासाहेब चिमणे यांच्यासह अनेक महाविकास आघाडीचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने मतदार संघातील कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी खासदार संजय जाधव यांनी चोवीस तास मतदार संघासाठी देणारे राजेश टोपे यांना मताधिक्याने निवडून द्या व राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार आणा असे आवाहन केले

 तर खा.कल्याण काळे यांनी महायुती सरकारवर टीका करत लाडकी बहिण योजनेचे पंधराशे रुपये देऊन या सरकारने शेतकऱ्याच्या सोयाबीन चा भाव सहा हजारावरून अदोतीशसे रुपये केला आणि तेल एकशे चाळीस रुपये किलो केले असे आरोप करत महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी राजेश टोपे यांना पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे संबोधित केले.तर ख.अमोल कोल्हे यांनी कोरोना काळात संपूर्ण महाराष्ट्राला वाचविणाऱ्या राजेश टोपे यांना पुन्हा मंत्री करण्यासाठी निवडून देण्याचे आवाहन केले.तर राजेश टोपे यांनी गेल्या पाच वर्षात आपण मतदार संघात जे विकास कामे केली त्याचा लेखाजोखा मांडत प्रत्येक कार्यकर्त्याने मतदार संघातील प्रत्येक घराघरात जाऊन तुतारी या चिन्हावर मतदान करून आपला विजय रथ सहाव्यांदा पुढे नेऊन मतदार संघातील प्रत्येक घटकांचा विकास करण्यासाठी व राज्यातून जातीभेद व मनुवादी सरकार हद्दपार करण्यासाठी तसेच राज्यात शरदचंद्र पवार,उद्धव ठाकरे,नाना भाऊ पटोले यांच्या महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी तुतारी घेऊन उभा असलेला माणूस या चिन्हावर प्रचंड मताधिक्य द्यावे असे आवाहन केले.